दापोली – दापोली तालुक्यातील एका आरोग्य सेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाशी दोन हात करत असताना दापोलीतील आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सेवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या प्रशासनासाठी चिंतेची बाब बनली आहे. त्याचबरोबर जनताही आता काळजीत पडली आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभाग दिवस -रात्र एक करत आहे. नागरिकांना कोरोना होऊ नये यासाठी ते सतत जनजागृती करत आहेत. ही लढाई लढताना आरोग्य विभागाच्या एका कर्मचाऱ्याला मृत्यूला समोरं जावं लागलं आहे. त्यामुळे ही लढाई आता कठीण बनत चालली आहे.