सातारा – सातारा जिल्यातील पाटण तालुक्याला मध्यरात्री भूकंपाच्या सौम्य धक्याने हादरवून टाकले. शनिवारी एक वाजुन 25 मिनिटांनी कोयना परिसरला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपमापन केंद्रांवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून 11.2 किलोमीटर वारणा खोरयात होते. कोयनाधरण परीसरात सध्या दमदार पाउस सुरु आहे. दरम्यान कोयना परिसरात झालेल्या भुंकपाचे धक्के कोणत्याही गावात जाणवलेले नाहीत. वारणा खोरे नजीक सहा किलोमीटर अंतरावर चांदोली येथे भुकंपाचा केंद्रबिंदू होता असे कळविण्यात आले आहे.