गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या लॉकडाऊनच्या कालावधीत गुहागर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू सावंत हे आपल्या राहत्या घरांमधून दारू विकत असताना गुहागर पोलिसांनी पकडल्याने गुहागरमध्ये एकच खळबळ माजली.
गुहागर तालुक्यातील जामसुत येथे एका घरातून गोवा बनावटीची दारू विकली जात असल्याची कुणकुण गुहागर पोलिसांनी मिळाली होती. यानंतर आज पोलिसांनी या गावात फेरी मारली असता चक्क शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू सावंत त्यांच्या घरातूनच दारू विक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्वरित त्या घरावर छापा मारला आणि बाबू सावंतला दारूच्या साहित्य सह ताब्यात घेण्यात यश आले त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या मुद्देमाल आणि बाबू सावंत याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गुहागर तालुक्यात शिवसेनेचा पदाधिकारी आपल्या घरातून दारू विकत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले त्यामुळे गुहागर तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. याआधी बाबू सावंत यांनी आपल्या उपतालुकाप्रमुख या पदाच्या जोरावर बनावट लायसन्स बनवून घेतल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळेला त्यांनी ज्या पत्रकारांनी हा प्रकार उघड केला होता त्या पत्रकाराला मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली होती. अशा अनेक तक्रारी या बाबू सावंत विरुद्ध असताना सुद्धा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने हा बाबू सावंत फोफावत गेला आणि आज जी शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करते त्याच शिवसेनेचे नाव बदनाम करण्याचं काम या बाबू सावंत यांनी केल्याने तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक सांगतात. त्यामुळे वरिष्ठांनी त्वरित याची दखल घेऊन शिवसेनेच्या सर्व पदावरून त्याच्या हकालपट्टी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.