चिपळूण तालुक्यातील रामपुर येथील कातकरवाडी येथील हा सुपुत्र प्रशांत आदवडे ग्रामीण भागात आपले शिक्षण करून शिक्षणासोबतच आपली काला जोपासत आज आपल्या शब्दाच्या व आवाजाच्या जोरावर संपूर्ण तरुणाई वर व क्रिकेट विश्वावर राज्य गाजवत आहे. याच प्रशांत आदवडेवर हा विशेष लेख
प्रशांत आदवडे याला नुकतंच चिपळूण तालुक्यातील रावळगाव येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सांस्कृतिक क्रिडा क्षेत्रात तब्बल ३० वर्षे उल्लेखनीय भरीव कामगिरी करणाऱ्या व भारतातील १२ राज्यात आपल्या कलाकौशल्याचा ठसा उमटवणार्या सुप्रसिद्ध समालोचक प्रशांत आदवडे यांना चिपळूण तालुक्यातील रावळगाव केळमाई प्रतिष्ठानच्यावतीने ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार प्रदान करून नुकतेच केळमाई यात्रा चषक २०२५ च्या ३२ व्या पर्वात आयोजित बक्षिस वितरण सोहळ्यात गौरविण्यात आले आहे. यानिमित्ताने कोकणचे रत्न महाराष्ट्र भुषण प्रशांतच्या शिरपेचात रोवले गेले ११ वे आभुषण !
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रशांत आदवडे यांनी भारतातील महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, राजस्थान, हरयाणा , चेन्नई, कोलकत्ता, गुजरात, दमण , गोवा , उत्तर प्रदेश , दिल्ली ,या राज्यात समालोचक म्हणून अलौकिक कामगिरी केली आहे.
भारत बांगलादेश वनडे सिरीज , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची कार्पोरेट शिल्ड, मुंबई क्रिकेट असोसिएशनची क् ल्पेश कोळी ,
प्रभोदन टी ट्वेंटी , पिंक बाॅल क्रिकेट स्पर्धा , टेनिस मधील अखिल भारतीय स्तरावरील २६ स्पर्धा, गोवा कबड्डी लीग , महामुंबई कबड्डी लीग ,अखिल भारतीय स्तरावरील शुटींग बॉल स्पर्धामध्ये दर्जेदार समालोचन केले आहे.. क्रिडा सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत स्काय फाऊंडेशन मुंबई समाज भूषण पुरस्कार २००९, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन मुंबई – गुणवंत गौरव पुरस्कार २०१५, सामाजिक समन्वय समिती मुंबई – सामाजिक न्याय समताभुषण पुरस्कार २०१६,
संयोग बहूउद्देशीय संस्था मुंबई -लोकसेवा गौरव पूरस्कार २०१६ , डॉ रुग्ण मित्र वृत्तपत्र मुंबई – सेवा रत्न पुरस्कार २०१६ ,आनंद कल्याणकारी संस्था डोंबिवली – कर्मभुमि सेवारत्न पुरस्कार २०१६, सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती – समता भुषण पुरस्कार २०१६, ओम साई मनशक्ती योग टीटवाळा – अष्टवदनी पुरस्कार २०१७, राजमुद्रा क्रिकेट ऍकॅडमी चिपळूण ‘जीवन गौरव पुरस्कार’ २०१८, एकुण ९ राज्यस्तरीय पूरस्कार व निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाऊंडेशनचा १ राष्ट्रीय असे दहा पुरस्कार प्रशांतच्या शिरपेचात रोवले गेले आहेत . ३० वर्ष क्रिडा क्षेत्रातील भरीव कामिगिरीची दखल घेत ज्या मैदानावर समालोचक म्हणून शुभारंभ केला होता त्या चिपळूण तालुक्यातील रावळगाव सुर्वेवाडीच्या मैदानावर अखंड भारतात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविल्याबद्दल सुवर्ण महोत्सवी वाटचाल करत असलेल्या केळमाई प्रतिष्ठानच्यावतीने केळमाई यात्रा चषक २०२५ व्यासपीठावर मानाचा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार २०२५ हा अकरावा पुरस्कार सन्मानपूर्वक नुकताच प्रदान करण्यात आला.प्रचंड मागणी असलेला व अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेट कबड्डी, शुटींग बाॅलच्या पटलावर व्यवसायिक स्पर्धामध्ये घुमणारा आवाज .. क्रिडा शौकिंनाच्या ह्दयात घर करत आहे