दापोली ; ४ किलो ८३३ ग्रॅम ‘अंबरग्रीस’ जप्त; पोलीस कर्मचाऱ्यासह चार आरोपींना अटक

0
120
बातम्या शेअर करा

दापोली – दापोली येथील एसटी स्टँडजवळ एका कारचा संशय आल्याने त्या वाहनाचा पाठलाग करून त्याला अडवण्यात आलेअसता त्या वाहनातून ४ किलो ८३३ ग्रॅम वजनाचा, “पांढरा आणि हलका तपकिरी रंगाचा घन पदार्थ, जो ‘अंबरग्रीस’ किंवा ‘व्हेलची उलटी’ असल्याचे मानले जाते”, असा पदार्थ सापडल्याने तो जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यासह चार जणांना अटक करण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे.

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे उल्लंघन करून काही लोक बेकायदेशीरपणे ‘अंबरग्रीस’ (व्हेलची उलटी) वाहतूक आणि विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याची विश्वसनीय माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर दापोली सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ही कारवाई सीमा शुल्क अधीक्षक (प्रतिबंधक आणि गुप्तचर) अतुल पोटदार यांच्या नेतृत्वाखाली (निरीक्षक), रामनिक सिंग (निरीक्षक), सुहास विलाणकर (मुख्य हवालदार), करण मेहता (हवालदार), प्रशांत खोब्रागडे (हवालदार), गौरव मौर्य (हवालदार), हेमंत वासनिक (हवालदार) आणि सचिन गावडे (हवालदार) यांनी केली. अटक केलेल्या ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून विविध गुन्हेगारी दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here