कंत्राटी डॉक्टर सलाईनवर! सहा महिने विनावेतन….

0
2
बातम्या शेअर करा

गुहागर – रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील कंत्राटी डाँक्टरांना गेले सहा महिने वेतनच झाले नसल्याने ऐन सणात त्यांच्यावर आर्थिकतेची संक्रांतच कोसळली आहे. ग्रामीण भागात रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या आरोग्य खात्यानेच हा एक प्रकार बूस्टर डोस दिल्याचे दिसून आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा आरोग्य विभाग आर्थिकृदष्ट्या व्हेंटीलेटरवर असल्याचे दिसून आले आहे. याचा सर्वाधिक परिणाम प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांच्या वेतनावर झाला आहे. कोवीड आपत्तीत आरोग्य विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी “न भूतो न भविष्यती” अशी सेवा बजावली होती. कोवीडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत या सेवेकरांची मोठी दमछाकच झाली होती. ना घर, ना सणवार असेच त्यांची नशीबी होते. त्यातच लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविली. गाव-वाड्यावस्त्यांवर जाऊन लसीकरण केले. लसीकरणावरुन कित्येकांचा रोषही पत्करला. मानसिक त्रास, कामाचा व्याप अशा स्थितीतही वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक यांनी आपले कर्तव्य चोख बजावले होते.

आरोग्य सेवेतील अशा कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना गेले सहा महिने वेतनच मिळालेले नाही. सातत्याने आरोग्य विभागाला याची विचारणा त्यांच्याकडून केली जात आहे. मात्र, शासनाकडूनच अनुदान आलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी थोडेफार अनुदान आले आहे मात्र, बिले भागवण्यासाठीच खर्ची होत आहेत. आरोग्य विभागाची आर्थिकदृष्ट्या मोठी दमछाक होत आहे.

–कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन सहा महिने थकले आहे. शासनाकडूनच अनुदान आलेले नसून आमचा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. डाँ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here