बातम्या शेअर करा

लंडन- चोकर्स म्हणून ज्यांनी आयुष्यभर शिक्का झेलला त्याच दक्षिण आफ्रिकेने WTC Final 2025 जिंकत इतिहास रचला आहे. बलाढ्या ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेने धुळ चारली आणि जेतेपदाला गवसणी घातली. एडन मार्कम यावेळी दक्षिण आफ्रिकेसाठी तारणहार ठरला. ऑस्ट्रेलियाला तो एकटा भिडला आणि देशाला पहिले वहिले विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचे जेतेपद जिंकवून दिले. मार्करमने यावेळी १३६ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आणि ते जग्गजेते ठरले.

ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेपुढे २८२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिका करणार की नाही, ही शंका सर्वांच्या मनात होती. कारण आतापर्यंत त्यांनी बऱ्याचदा ऐनवेळी कच खाल्ली होती. पण आपल्यावर लागलेला चोकर्स हा शिक्का एडन मार्कमच्या शतकाने पुसून टाकला. सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मार्करम बलाढ्य शिलेदारासारखा ऑस्ट्रेलियाच्या विजयाता मार्गात ठामपणे उभा राहीला आणि अभेद्य फलंदाजी करत त्याने जेतेपदाच्या किल्ल्यावर आपल्या देशाचा झेंडा फडकवला. मार्करमला कर्णधार तेंदा बवुमा चांगली साथ देत होता. पण त्याला अखेरपर्यंत मार्करमला साथ देता आली नाही.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here