एसटी कर्मचाऱ्यांना जूनचा पगारही ५० टक्केच मिळणार?

0
214
बातम्या शेअर करा

मुंबई – राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या पगाराप्रमाणे जूनचा महिन्याचा पगार ५० टक्के मिळण्याची शक्यता आहे. राज्यात असलेल्या लॉकडाऊनमुळे दररोज एसटीचे २२ कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडत आहे. परिणामी, एसटीला कर्मचाऱ्यांचे वेतन देताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे जूनचा पगारसुद्धा अर्धाच मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्य सरकारने सवलत मूल्यापोटी प्रतिपूर्तीची रक्कम दिल्यामुळे एसटी कर्मचार्यांना मार्चचे ७५%, एप्रिलचे १००% व मेचे ५०% वेतन देण्यात आले. मात्र आता राज्य सरकारकडून सवलतीचे पैसे येणार नाहीत. परिणामी, दररोज बुडणारे २२ कोटी प्रवासी उत्पन्न, वाढता इंधन खर्च यामुळे महामंडळाचे आर्थिक गणित बिघडले आहे.त्यामुळे जूनचा पगारही ५० टक्के मिळण्याची शक्यता आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here