जयपूर – राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज असलेल्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक ठोकणारा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात गुजरातविरुद्ध सामन्यात वैभवने हा इतिहास रचला. याच सामन्यात त्याने पाच मोठे विक्रम केले आहेत. वैभवने 35 चेंडूत 7 चौकार आणि 11 षटकारांसह शतक ठोकले. हे त्याचे आयपीएलमधील पहिलेच शतक आहे. वैभव सूर्यवंशी यांने राजस्थानकडून यशस्वी जैस्वालसह सलामीला फलंदाजीला उतरला. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत त्याने मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर अशा अनुभवी गोलंदाजांविरूद्धही मोठे शॉट्स खेळले.