रत्नागिरी – टेनिस रबर बाॅल क्रिकेट जगतातील हॅलीकाॅप्टर बाॅय व बाईकरमॅन मैदानावर सामाना जिंकण्यासाठी ६ चेंडूत फक्त ६ धावांची आवश्यकता असताना ५० वर्षाच्या विनय गोवेकर यांनी या दिग्गज फलंदाजाना फिरकीच्या तालावर अक्षरशः नाचवले आणि रंगतदार रोमहर्षक सामन्यात ६ धावा डिफेंड करून क्रीडा जगतात खळबळ माजवून स्पर्धेत मोठा उलटफेर केला. विनयच्या अफलातून कमगिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.
रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रिडा संकुलावर संपन्न झालेल्या बी ए किंग्ज चॅम्पियन्स रेनी ट्राॅफीच्या चौथ्या पर्वात पावस विरूद्ध दत्तप्रसादीक घुडेवठार हा रोमहर्षक सामना सुप्रसिद्ध केतन म्हात्रे, श्रेअस कदम आणि यष्ट्याच्या मागे बाॅल बाॅय म्हणून काम करणाऱ्या ५० वर्षाच्या विनयय गोवेकर यांच्यामध्ये चांगलाच रंगला.निर्णायक षटकात पावस संघाला विजयासाठी ६ चेंडूत ६ धावांचे अगदी सोपे आव्हान होते. घूडेवठार संघाने प्रदिर्घ चर्चेनंत कर्णधार गौरव नागवेकरने अनूभवी विनयच्या हातात चेंडू दिला. प्रेक्षकांना वाटल की सामना दोन तीन चेंडूत संपेल पण मैदानावर जे घडले ते पाहून सर्वांनीच तोंड बोटात घातली..पहीला चेंडू विनयने गुंडलेंन्थ स्पाॅटवर लेगब्रेक टाकला, चेंडू वळला फलंदाज चकला निर्धाव, दुसर्या चेंडूसाठी श्रेअस शफल झाला विनयने फलंदाजाला फाॅलो करत चेंडूला उंची देत थोडासा पुढे टाकला चेंडू श्रेअसच्या शरीरावर आदळला.. निर्धाव, समीकरण ४ चेंडू ६ धावा..लेगब्रेक उसळली घेणारा तिसरा चेंडू श्रेअसने फाईन लेगला घोषाकींत क्षेत्रात खेळत १ धाव मिळवली.
चौथा चेंडू श्रेअसने पुढे सरससावत मिडविकेटला खेळला,क्षेत्ररक्षकांने खराब क्षेत्ररक्षण केल्याने केतन श्रेअसने चपळाईने दोन धावा घेतल्याने उत्कंठा शिगेला पोहचली.आता प्रत्येक चेंडूवर प्रेक्षकांच्या शिट्ट्या टाळ्यांच्या गजर भोपूचा आवाज यामुळे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. दोन चेंडूत तीन धावा विनयने फ्लाॅईट दिलेल्या चेंडूवर श्रेअस अडखळला धाव घेण्याच्या नादात तो धावचित झाला.शेवटच्या चेंडूवर ३ धावांची आवश्यकता होती. ३७ बाईकचा धनी प्रसिद्ध फलंदाज केतन म्हात्रे स्ट्राईकर एन्डवर पुन्हा चर्चा टाळ्या शिट्या गजर उत्सुकता शिगेला पोहोचली..पुढे सरसावत केतनने ऑनड्राईव्ह केला एक धाव पुर्ण नाॅनस्ट्राईकर थोडीशी गडबड एव्हाना दोन धावा पुर्ण.. तिसऱ्या धावेसाठी धडपड सुरू झाली.नाॅनस्ट्राईकरवरून थ्रो स्ट्रायकर एंन्डला गौरवने एका हाताने चेंडू घेत यष्ट्या उडवल्या…घुडेवठार संघाचा शिट्ट्या टाळ्यांचा गजर विजयाचा जल्लोष, स्पर्धेतील पहीला उलटफेर अन ५० वर्षाच्या विनयन गोवेकरने प्रमोद महाजन क्रिडा संकूलावर इतिहास रचला.