बातम्या शेअर करा

 मुंबई – गोवा महामार्गवरील परशुराम हे गाव चिपळूण तालुक्यात येत. श्रीक्षेत्र परशुराम हे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले महेंद्र पर्वतावरील तीर्थक्षेत्र आहे.चिपळूणपासून पाच मैलांवर असलेल्या या तीर्थक्षेत्रास श्रीपरशुरामांच्या वास्तव्यामुळे पौराणिक संदर्भ आहेत व परमहंस ब्रह्मेंद्रस्वामी यांनी तीनशे वर्षांपूर्वी तेथे उभारलेल्या प्रकल्पाला व महाराष्ट्रभर केलेल्या सार्वजनिक व हिंदवी स्वराज्याच्या कार्याला विशेष महत्त्व आहे कोकणला ‘देवभूमी’ मानण्यात येते. येथील सुंदर निसर्ग, अथांग सागराचे व सह्याद्रीच्या शिखरांचे सान्निध्य व लोकोत्तर महापुरुषांची जन्मभूमी हे कोकणचे वैशिष्ट्य या देवभूमीत शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेली अनेक देखणी मंदिरे आहेत, सिद्ध पुरुषांची पवित्र स्थाने आहेत. अनेक मंदिरे स्वयंभू स्थान लाभलेली आहेत. साऱ्या देशातून या देवभूमीत पर्यटनासाठी आणि देवदर्शनासाठी भाविक येत असतात. कोकणी माणूस अत्यंत धार्मिक तेवढाच अतिथ्यशील आहे.   


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here