बातम्या शेअर करा

करियर करताना अभ्यास हा सर्वात महत्वाचा भाग आहे .

1.कधीही फार तास सलग अभ्यासाला बसू नये. तासाभराने दहा मिनिटांचा ब्रेक घ्यावा.

2.सर्वात प्रथम अभ्यासासाठी टाइम टेबल बनवा. त्या टाइम टेबलचे काटेकोरपणे पालन करा. जर तुम्हाला लक्षात राहणार नसेल तर ते टाइम टेबल तुमच्या डोळय़ाला दिसेल अशा ठिकाणी लावावे, जेणेकरून ते पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल.

3.अभ्यास करताना पाठांतर न करता प्रथम प्रश्न व उत्तर नीट वाचा. समजून घ्या व ते समजल्यानंतर तुमच्या भाषेत लिहिण्याचा प्रयकरा. यामुळे ते तुमच्या लक्षात राहील व पाठांतर करण्याची गरज नाही.

4.वाचल्यानंतर एकदा ते हाताखालून गेले पाहिजे. म्हणजेच तुम्ही काय वाचलं ते बघून लिहा; पण एकदा तरी लिहा. त्यामुळे कधी कधी वाचलेले लक्षात राहत नाही; पण लिहिलेले राहते.

5.फ्रेश वातावरण असलेल्या ठिकाणी अभ्यासाला बसा.

6.वीकेण्डला स्वत:ची परीक्षा घेऊन पुस्तकांप्रमाणे चेक करा किंवा पालकांना चेक करायला सांगा. त्यामुळे तुमचा सराव किती झाला हे तुम्हाला कळेल.

7.वाचताना महत्त्वाची वाक्ये, शब्द, लाइन अधोरेखित करून ठेवत जा, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही पुस्तक चाळाल तर तुम्हाला ते वाचलेले पटकन लक्षात येईल.

8.दररोज १५ मिनिटांचा वेळ उजळणीसाठी ठेवावा.

9.दहावी किंवा १२वीच्या विद्यार्थ्यांनी सुट्टय़ामध्ये अभ्यासक्रमाची पुस्तके चाळावीत म्हणजे नवीन अभ्यासक्रम असल्यास डोळ्याखालून गेल्याने तुम्ही पुन्हा वाचाल तेव्हा ते तुम्हाला पटकन समजेल.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here