गुहागर – कोकणातली अनेक गावात पुरातन वस्तू या जपुन ठेवल्या जात आहेत.तर काही ठिकाणी त्यावर संशोधन देखील सुरू आहे.गुहागर तालुक्यातील देवघर येथील तेलेवाडी येथे नुकतेच २ पुरातन आतून गोलाकार असलेले व दगडात कोरलेले रांजण आढळले आहेत. त्यामुळे सध्या देवघर येथे ते रांजण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

या ठिकाणी आढळलेले पुरातन व आतून गोलाकार असलेले व दगडात कोरलेले रांजण तसेच ह्यावर ठेवण्याचे दगडी झाकनाचे काही भाग सुद्धा या परीसरात सापडले आहेत.त्यामूळे हा अमूल्य असा पुरातन ठेवा आपण जपला पाहिजे ह्या भावनेने श्री सप्तेश्वर प्रतिष्ठान देवघर या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने याचे संवर्धन करण्याचे काम सुरू केले आहे.या पुरातन रांजणाचा वापर धान्य किंवा ईतर वस्तू ठेवण्यासाठी करण्यात आला असावा असे मत इतिहास अभ्यासक सचिन जोशी यांनी व्यक्त केले. यासाठी प्रतिष्ठानचे युवा व ज्येष्ठ नागरिक यांनी अंगमेहनत घेतली व पुरातन रांजण चे जतन करण्यास हातभार लावला.