रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील हेदवी हे गाव गावाच्या उत्तरेला गुहागर डोंगराच्या कड्यावर श्री दशभुजा लक्ष्मी – गणेश मंदिर आहे. मंदिराची स्थापना पेशवे काळात श्री केळकर स्वामी यांनी पेशव्यांच्या मदतीने केली.
हे कोकणातील अष्टविनायकांमधील एक आहे. गणपतीची दशभुजामूर्ती साडेतीन फूट ऊंच असून सिंहासनाधिष्ठ आहे. मूर्ती संगमरवरी व डाव्या सोंडेची आहे. सोंडेत अमृत कलश असून डाव्या मांडीवर लक्ष्मी विराजमान आहे. मंदिर एका टेकडीवर उपवनात बांधलेले आहे. मंदिरासमोर दीपमाळ आहे. गाभाऱ्यासमोर लांब सभामंडप आहे. मंदिराच्या भोवती मजबूत दगडी तट आहे. भाद्रपद व माघ महिन्यात यात्रा भरते, दीपोत्सव साजरा करण्यात येतो.