हनी ट्रॅप म्हणजे काय?

0
353
बातम्या शेअर करा

एखाद्याकडून गुप्त माहिती काढण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी महिलांचा वापर करुन त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे याला हनी ट्रॅप म्हणतात. या पद्धतीला जगभरात सर्वत्र हजारो वर्षांचा इतिहास आहे. (विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी मेनकेला पाठवण्यात आलं होतं. हाही पुराणातला ‘हनी ट्रॅप’च) गुप्तहेरांपेक्षा हे काम प्रभावी मानलं जातं.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ‘हनी ट्रॅप’ खूप गाजले होते. मॅच फिक्सिंग प्रकरणात बुकींकडून असा ‘हनी ट्रॅप’ लावल्याचे नुकतेच समोर आले होते. मंत्री, व्यावसायिक, खेळाडू या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत.

हे हनी ट्रॅप काही नवीन नाहीत. याला अगदी पहिल्या वर्ल्ड वॉरपासूनचा इतिहास आहे. यात नेहमी हाय प्रोफाईल लोकांना फसवण्यात येतं. नेते, आयएएस अधिकारी, इंजिनिअर, व्यापारी, नेते, पत्रकार यासर्वांना हनी ट्रॅपमध्ये फसवल्याची अनेक उदाहरण सापडतील. सेक्स व्हिडीओ, अश्लील चॅट या सगळ्यांवरुन या दरम्यान ब्लॅकमेलिंग केलं जातं.

राजकारण, कॉर्पोरेट, फॅशन, मनोरंजन, गुप्तचर यंत्रणा, लष्कर, खेळ इत्यादी सगळ्याच क्षेत्रांत हनी ट्रॅप चालतं. गोपनीय माहिती मिळवून आपला फायदा करण्यासाठी किंवा समोरच्यावर वार करण्यासाठी याचा वापर होतो. हनी ट्रॅपमध्ये ट्रॅप अर्थात सापळा टाकण्यासाठी महिलांचाच सर्वाधिक वापर होतो


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here