मुंबई – डॉ अरूण प्रभुणे व डॉ टेरेसा पिझान यांनी पुर्नकथीत केलेल्या “वाॅटर स्टोरिज ऑफ नेटीव्ह अमेरिकन अँड एशियन इंडियन इटस् लिजेंड ऑफ रेन रिव्हर्स अँड लेक्स “या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच सनस्टोन प्रकाशन अमेरिका यांच्याकडून अमेरिकेत करण्यात आहे.अमेरिकन लेखिका व लोकसाहित्याच्या संशोधिका संकलक डॉ तेरेसा पिजाॅन व लेखक संशोधक डॉ अरूण चिंतामण प्रभुणे या दोघांच्या स्वतंत्र लिहीलेल्या प्रस्तावना हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
भारत व अमेरिका या दोन देशांतील भिन्न सा़ंस्कृतीक केवळ जलतत्वाशी संबधीत लोककथा दंतकथांच्या संशोधित बिजांना पुर्णरूपात साकारणारे अमेरिकन प्रकाशकाकडून अमेरिकेत प्रकाशित होणारे हे पहिलेच पुस्तक आहे.
महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्यप्रदेश या चार राज्यातील एकूण दहा कथा यात आहेत व दहा कथा मुळ रहिवासी अमेरिकेतील आहेत.एकूण वीस कथा आहेत.भारत आणि अमेरिका यात मोठे अंतर असुनही श्रद्धा समजुती कल्पना यात कमालिचे साम्य असणार्या कथा यात आहेत .या साम्याला केंद्र ठेऊन या कथा निवडलेल्या आहेत.संशोधनातून संकलित केलेल्या असल्यातरी त्यांना पुर्णरूप प्राप्त झाल्याने रंजक असल्याने सामान्य वाचकाला तर त्या आवडतीलच पण लोकसाहित्याच्या अभ्यासकालाही उपयुक्त ठरतील अश्या आहेत.
या पुस्तकासाठी त्यांनी मोजक्याच कथा निवडल्या.लोकरूढी लोकसमजुती आणि लोकपरंपरावर आधारलेल्या भारतात वर्षानुवर्ष सांगीतल्या गेलेल्या ,कोणत्याही पुस्तकात समाविष्ट नसलेल्या प्रथमच वाचकांना परिचीत होणार्या लोककथांची दंतकथांची निवड त्यांनी केली आहे. डॉ अरूण प्रभुणे यांच्या संकलित कथांशिवाय अन्य चार मान्यवर कथा निवेदकांनी संकलकांनी संकलित केलेल्या कथा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.यात
गुहागर येथील खरे ढरे भोसले महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ बाळासाहेब लबडे यांचे लोककथा मध्ये डॉ बाळासाहेब लबडे यांनी संशोधित केलेल्या दोन लोक कथांचा सहभाग आहे.कवी मोहन पाटील यांचे सहकार्य झाले आहे.त्या बरोबर सातारा येथील लेखिका सावित्री जगदाळे यांच्या दोन लोककथा समाविष्ट आहेत.सोलापुरचे डॉ उमाकांत वाळवेकर, डॉ माधुरी वाळवेकर, व भिमण्णा दरगो पाटील नाशिकचे ऋषिकेश वाकदकर यांच्या लोककथा दंतकथा यांची बीजे स्वीकारून प्रकृती वैशिष्ट्यांना कायम ठेऊन डॉ अरूण प्रभुणे यांनी विकास केला आहे.त्यांना ललित कथांचे रूप दिलेले आहे.अशाप्रकारे सिद्ध झालेले हे पहिलेच पुस्तक असावे.या पुस्तकात त्या त्या कथा स़कलकांची नोंद करण्यात आली आहे. डाॅ लबडे यांच्या संशोधित लोककथा ह्या कोकणातील पालशेत येथील खारवी समाजातील बोरीवसं ही कथा कवी मोहन पाटील व त्यांच्या मासेमारी संबंधीत आहे.तर दुसरी लोककथा ही गुहागर कीर्तनवाडी येथील आहे.या दोन लोककथांचे तुलनात्मक परीक्षण व लोककथा अशा दोन्हींची मिळुन चाळीस अमेरिकन इंग्रजीत समाविष्ट आहेत.त्यामुळे कोकणचे पर्यायाने भारताचे नाव या संशोधनामुळे झाले आहे .लेखिका व कवयत्री श्रीमती सावित्री जगदाळे यांच्या कथांचा परिसर सातारा व निरा नदी आहे. सोलापुरचा परिसर भुईकोट किल्ल्याच्या समाजमान्य दंतकथेमुळे डॉ उमाकांत वाळवेकर, डॉ माधुरी वाळवेकर, व भिमण्णा दरगो पाटील यांच्यामुळे दखलपात्र झाला आहे. नाशिकचे गिर्यारोहक उद्योजक डॉ ऋषिकेश वाकदकरयांची डांग्या तलावाची वैशिष्ट्यपुर्ण दंतकथा यामुळे नाशिक परिसर परिचित होणार आहे ऋषिकेश वाकदकर यांच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रती जगभर वितरित करण्यात आलेल्या आहेत.अमेरिकन कान्ग्रेस लायब्ररीत हे पुस्तक पोहचले असून अमेरिकेत सर्वविद्यापीठात व महाविद्यालयात पोहचेल.