गुहागर; मालाणी ग्रुपचे ‘मालाणी एम्पोरियम ‘ बिल्डींग मटेरिअलचे भव्य शोरूम सुरू

0
721
बातम्या शेअर करा

शृंगारतळी – गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या शृंगारतळी बाजारपेठेत मालाणी ग्रुपचे मालाणी एम्पोरियम हे बिल्डींग मटेरिअलचे भव्य शोरूम जनतेच्या सेवेसाठी सुरू झाले आहे.
विविध प्रकारचे टाईल्स, मारबल, ग्रेनाईट, मरबोनेट, लादी, स्टील, पत्रे, बाथटब तसेच नामवंत कंपनीच्या आधुनिक बिल्डींग मटेरिअलसाठी आता गुहागर वासियांना कोल्हापूर, मुंबई येथे जावे लागणार नाही. कारण तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी पालपेणे रोड येथे मालाणी ग्रुपचे मालाणी एम्पोरियम हे बिल्डींग मटेरिअलचे भव्य शोरूम जनतेच्या सेवेसाठी सुरू झाले आहे. मालाणी ग्रुपला शृंगारतळीत व्यावसायात रूजू होऊन ७० वर्ष पूर्ण होत असल्याने मालाणी ग्रुप तर्फे दिनांक १० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२० या दरम्यान मालाणी एम्पोरिअम तर्फे आनंद सप्ताह साजरा केला जात आहे.

शृंगारतळी बाजारपेठेत बिल्डींग मटेरिअलची अनेक दुकाने आहेत. परंतु शौकीन लोकांना नवीन पद्धतीचे व फैन्सी बिल्डींग साहित्य या ठिकाणी उपलब्ध नव्हते. घरामध्ये विविध शोभिवंत वस्तूसाठी तसेच नामावंत कंपनीचा माल खरीदण्यासाठी मुंबई अथवा कोल्हापूर येथे ग्राहकांना जावे लागत असे परंतु मालाणी एम्पोरिअमच्या दालनात एकाच ठिकाणी या सर्व वस्तू ग्राहकांच्या सेवेसाठी वाजवी दरात उपलब्ध आहेत. याचा खूप मोठा फायदा ग्राहकाना होणार आहे. मालाणी ग्रुपतर्फे साजरा होणार्या आनंद सोहळ्या दरम्यान अनेक मान्यवरांनी मालाणी एम्पोरिअमला भेट देऊन मालक शोएबशेठ मालाणी यांना शुभेच्छा दिल्या. या दुकानाच्या माध्यमातून आपण घरातून सुद्धा ऑनलाइन ऑर्डर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here