खेड – नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतून विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. त्यात खेड तालुक्यातील भडगाव येथील कै.प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर येथील विक्रम विजय पालकर याने या परीक्षेत 87.75% गुण मिळवुन चांगले यश मिळवले आहे.
खेड तालुका शिक्षण क्षेत्र नेहमीच उच्च शैक्षणिक दर्जासाठी प्रसिद्ध असून खेड शैक्षणिक क्षेत्रासाठी मानाचा तुरा ठरला आहे. भडगाव शाळेतील कु विक्रम विजय पालकर याने शिष्यवृत्ती परिक्षेत २५८ गुण घेवून राज्य गुणवत्ता यादी क्र.14 वा तर राष्ट्रीय गुणवत्ता यादी क्र.9 वा तर
5 वी शिष्यवृत्ती जिल्ह्यात 4 था आला आहे. त्याचे वडील शिक्षक असुन विजय पालकर सौ.वर्षा पालकर यांच्या सह
प्राचार्य मगदूम सर ,यादव सर भोसले ,आव्हाड सर ,टेंबे सर सौ.जामकर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे.