बातम्या शेअर करा

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते पप्पू चव्हाण यांनी आपल्या जिवन प्रवासातील गेली ४६ वर्ष जनतेची सेवा करण्यात धन्यता मानली आहे. पप्पू चव्हाण यांनी राजकारणा पेक्षा समाज कारणाला प्राधान्य दिले या माध्यमातूनच त्यांचा मित्रपरिवार ही गुहागर तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. त्यातच ते कोणत्याही प्रसंगी अडीअडचणीत असलेल्या कुठच्याही जाती धर्माच्या व्यक्तीला त्यांनी तन,मन, धन आणि शक्य होईल तेवढी मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात असा त्यांचा स्वभाव आहे.

पप्पूशेठ चव्हाण यांनी समाज सेवेच्या परंपरेचा वसा त्यांच्या वडिलांकडून व आईकडून घेतला आहे. तसेच त्यांच्या आई सुजाता चव्हाण या गुहागर पंचायत समिती येथे काही काळ उपसभापती म्हणून त्यांनी कामही केला आहे. आज देखिल सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्या उल्लेखनीय काम करीत आहेत. आज त्यांचे वडील अशोक चव्हाण (भाई) हयात नसले तरी सामाजिक जिवनात वावरताना पप्पू चव्हाण हे आपल्या वडिलांची उणीव भासू देत नाहीत. आपल्या वडिलांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा दोन मुली, तीन बहिणी या त्यांना समाज सेवेसाठी प्रेरीत करीत आहेत. पप्पू चव्हाण यांच्या कडून अशीच समाज सेवा घडत रहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज त्यांचा वाढदिवस असल्याने अनेक जणांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये मंगेश तावडे, तेजस आंबेकर , प्रमेय आर्यमाने, महेश भाटकर, पिंटू सुर्वे यांच्यासह अनेकांनी यांचे अभिंनदन करुन निरोगी आयुष्य लाभो अशा मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here