गुहागर- गुहागर समुद्र किनार्यावर उभारलेल्या सीव्हू गॅलरीचा आज शनिवारी अस्त होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला ही सी व्ह्यू गॅलरी पाडण्याचे लेखी आदेश प्राप्त झाल्याने आज गॅलरी पाडण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. मात्र असे असले तरी ही गेलरी पडण्याने यातून गुहागरच्या पर्यटन विकासावर परिणाम होणार व समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होणार असल्याची प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली आहे. तत्कालीन नगरविकास मंत्री व पालकमंत्री आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरची नगरपंचायत केली. त्यानंतर पर्यटन वाढावे, यासाठी समुद्रामध्ये फ्लोटिंग, सीव्हू गॅलरी तसेच नाना-नानी पार्क, नक्षत्रवन टुरिझमच्या माध्यमातून साकारले होते. सीव्हू गॅलरी सीआरझेडची परवानगी नसल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुणे यांच्या आदेशानुसार पाडली जात आहे. दरम्यान, गॅलरी पाडण्यासाठी मेहनत घेणाऱ्यांचे जाहीर अभिनंदन, अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांनी केलेले अभिनंदन बाबतची प्रतिक्रिया सोशल मीडियावर आज जास्तच चर्चेत आहे.