गुहागर – विनापरवानगी खैराची वाहतूक करणारी गाडी जप्त

0
994
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील पालपेणे येथे विनापरवानगी खैराची वाहतूक करणारी गाडी जप्त करण्यात आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेली काही दिवस या परिसरात चोरटी खैराची वाहतूक होती याची चर्चा होती आणि ती अखेर खरी झाली तेच या निमित्ताने स्पष्ट झाले.

तालुक्यातील पालपेणे येथील सोन्या पालकर यांच्या जागेतील खैर अज्ञात व्यक्तीने तोडल्याची तक्रार या व्यक्तीने केली होती. त्यानंतर याच व्यक्तीच्या सामायिक जागेत चिपळूण तालुक्यातील उभळे येतील चव्हाण हा व्यक्ती आपल्या गाडीत खैरभरताना दिसून आल्याने त्यांनी याबाबत वनविभागाला कळवले वनविभागाचे अधिकारी वनपाल अमित निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवकर यांनीही कारवाई केली. या कारवाईमध्ये एक लाख रुपयांच्या किमतीचा खैरस जप्त करण्यात आला असून वाहतूक करणारी महिंद्रा कंपनीची सुमारे पाच लाख रुपये किमतीची गाडी जप्त करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास वन गुहागरचे वनाधिकारी करत आहेत.

तालुक्यात अनेक ठिकाणी खैराची वाहतूक होत असल्याचे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच मार्गावर वनविभागाचे अधिकारी असतानाच ही मोठी कारवाई केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here