गुहागर ; गुहागर तालुक्यातील खरे- ढेरे कॉलेजमध्ये प्राध्यापकांना झालेल्या मारहाण प्रकरणी आणि तिथे होत असलेल्या बोगस डिग्री करणे शासनाने घटित केलेल्या चार सदस्य समितीने नुकती या कॉलेजला भेट देऊन याबाबत चौकशी केली.
गुहागर येथील खरे ढेरे कॉलेज येथे बोगस डिग्री प्रकरणी प्राध्यापकांना झालेल्या मारहाणी बाबत आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा चांगलीच गाजवली या कॉलेजमधील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली होती. त्याचवेळी उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चार सदस्य समिती स्थापन करून याची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. त्याच आधारावर नुकतीच चार सदस्य समिती यांनी गुहागर येथील खरे ढेरे कॉलेजला भेट देऊन संबंधित प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. यावेळी समितीमध्ये प्रोफेसर डॉक्टर अनिल चौगुले, योगेश आहेर प्रशासकीय अधिकारी सहसंचालक कार्यालय महाराष्ट्र, डॉक्टर राऊत , डॉक्टर येलगे , आधी चार जणांचा समावेश असणारे ही समिती या ठिकाणी आली होती या समितीतील सदस्यांनी या महाविद्यालयात चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या बोगस प्रवेशाबद्दल आणि परीक्षेत होणाऱ्या प्रचंड गैर कारभाराबद्दल माहिती घेतली. त्यानंतर काही विद्यार्थी आणि काही शिक्षकांची त्यांनी चर्चा केली. ही समिती काही दिवसातच आपला अहवाल शिक्षण मंत्र्यांना सादर करणार आहे. त्या समितीने दिलेल्या भेटीनंतर आता या संबंधित कॉलेज बाबत शासन नक्की काय निर्णय घेणार याबाबत सध्या गुहागर तालुक्यात चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाने घटित केलेल्या चार सदस्य समितीच्या चौकशी सह काही महिन्यापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या समितीनेही तीन वेळा भेट देऊन या कॉलेजच्या बाबत आपला अहवाल सादर केला आहे.