बातम्या शेअर करा


गुहागर – दिवाणी न्यायालय गुहागर व विधी सेवा समिती गुहागर मार्फत गुहागर तालुक्यातील ग्रा.पं. खामशेत येथील सभागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर तसेच स्त्री भ्रूणहत्या या विषयावरती कायदे विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणेत आले होते.


या शिबिराध्ये विधी सेवा समिती गुहागरचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश पी.व्ही.कपाडीया यांनी कायद्यामधील तरतुदी लोकांना साध्या आणि सोप्या भाषेत सांगितल्या. तसेच गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी कायद्याची पार्श्वभूमी आणि प्रस्तावना केली, ज्यामध्ये हा कायदा लागू करण्याची वेळ का आली? या संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी शेखर भिलारे, वकील प्रितम कपाडिया, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शरद भांड, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका महाडिक सरपंच मंगेश सोलकर, उपसरपंच विष्णू पारदळे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा माचिवले, अस्मिता कदम, तंटामुक्त समिती अध्यक्ष शशिकांत गुडेकर, पोलीस पाटील संजय माने, ग्रामपंचायत अधिकारी आर ए मोहिरे यांच्यासह वाडी अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here