गुहागर ; ‘मॉक ड्रिल’च्या पार्श्वभूमीवर शृंगारतळीत वाहनांची तपासणी

0
260
बातम्या शेअर करा

गुहागर – ‘मॉक ड्रिल’च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील शृंगारतळी पोलीस चौकी येथे अशाच पद्धतीने नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केली आहे. त्याची सुरुवात ७ मे रोजी झाली. जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ४ वाजता पाच ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ झाले. शृंगारतळीत सायरन वाजविला गेला. पोलिसांनी सर्व वाहने थांबून त्यांची तपासणी केली. दरम्यान, या कालावधीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन गुहागर पोलिसांकडून करण्यात आले. मॉक ड्रिलसाठी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रथमोपचार यांचा समावेश करण्यात आला होता. तालुकास्तरीय यंत्रणांनी आपले नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून मत्स्यविभाग, बंदरे, मेरीटाईम बोर्ड, आरपीपीएल ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात आले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here