रत्नागिरी – वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेली अवैध कामे न केल्यामुळे मला माझ्या कुटुंबापासून दूर केलं….
चिपळूण मधील पोलीस कर्मचाऱ्याच्या व्हिडिओ मुळे रत्नागिरी पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
इम्रान शेख असे व्हिडिओ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव पोलीस खात्यातील लोकांकडून दबाव आणला जात असल्याचा इम्रान शेखचा दावा आहे.दबावापोटी दापोली, चिपळूण आणि आता मुख्यालय अशी बदली केल्याचा कर्मचाऱ्याचा आरोप करत आहे.वारंवार करण्यात येणाऱ्या बदलीमुळे संतप्त पोलीस कर्मचाऱ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.
पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून देखील अध्याप कारवाई नाही.15 जानेवारी पर्यंत कारवाई न झाल्यास चुकीची कामे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याचा इशारा या पोलीस कर्मचाऱ्याने दीला आहे.व्हॉट्स अप स्टेट्स वर नाराजी व्यक्त करणारा व्हिडिओची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे.