गुहागर – नवीन वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल टँकर चालक संपावर गेले आहेत. मध्यरात्री १२ वाजेपासून टँकर चालकांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून टँकर चालकांनी ‘स्टिअरिंग छोडो’ आंदोलनाची घोषणा करत संपाची घोषणा केली आहे. या संपाला पाठिंबा म्हणून गुहागर तालुक्यातील सर्वच वाहतूक व्यवसायिकानी आणि आज आपले व्यवसाय बंद ठेवत लाक्षणिक संप सुरू केला आहे.
गेल्या आठवड्यात ट्रक चालक आणि पेट्रोल-डिझेल टँकर चालक यांनी संपाची हक दिली होती. नवीन वाहन कायद्याला विरोध करत ट्रक चालक संपत सहभागी झाले होते. मात्र, सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला होता. परंतु, आता पुन्हा एकदा आजपासून ट्रक चालक आणि पेट्रोल-डिझेल टँकर चालक यांनी संपाची हाक दिली आहे.
दरम्यान, आज गुहागर तालुक्यातील सर्वच वाहतूक व्यवसाय करणाऱ्या चालक आणि मालकाने शृंगारतळी येथे एकत्र येत आज आपले व्यवसाय बंद ठेवले आणि शासनाच्या या निर्णयाविरोधात निषेध नोंदवला आजच्या या संपामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.