गुहागर -चिपळूण मार्गावरील या कामामुळे आम्हाला खूपच आनंद झाला….. आम्ही असेच वागणार..

0
1149
बातम्या शेअर करा

मार्गताम्हाणे- होय आपण जे वाचताय ते खरच आहे. कारण आम्हाला खरच खूप आनंद झाला आमचा आनंद गगनात मावेना सा झालाय तुम्ही गुहागर- चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावर अपघात होणार म्हणून चिवेली फाटा येथे गतिरोधक टाकले त्यामुळे तुमचे धन्यवादच मात्र त्यामुळे आम्ही सुद्धा फायद्यात आलो त्यामुळे आम्ही तुमचे आभारी आहोत.

असंच सध्या सगळे नागरिक व व्यापारी वर्ग मनातल्या मनात म्हणत असतील असंच यावरून वाटतं त्याला कारणही तसेच आहे. गुहागर चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण नुकतंच काही वर्षांपूर्वी पूर्ण झाले या मार्गावरील चिवेली फाटा येथे अपघात होतात म्हणून येथील स्थानिक ग्रामस्थांनी गतिरोधक टाकण्याची मागणी केली त्यांच्या मागणीची पूर्तता म्हणून हायवे विभागाने त्वरित गतिरोधकही टाकले. त्यामुळे अपघाताला आळा बसला मात्र असं असलं तरी याच गतिरोधक मुळे याच रस्त्याच्या कडेला असणारे दुकानदार ,व्यवसायिक ,अनधिकृत वाहतूक करणारे गाड्या ,रिक्षा यांना मात्र रान मोकळे झाले कारण तुम्ही या मार्गावर अपघात होऊ नये म्हणून गतिरोधक घातले. मात्र आम्ही काही सुधारलो नाही. कारण आम्ही अजूनही आहोत तसेच आहोत….. तुम्ही गतिरोधक घातल्यामुळे आम्ही आमच्या दुकानाच्या पाट्या ,हॉटेलचे बोर्ड ,भाजीच्या टपऱ्या ,मच्छीची विक्री, आधी बिनधास्तपणे रस्त्याच्या साईड पट्टीवर करू लागलो. तसेच रस्त्याच्या साईड पट्टीला आम्ही अनाधिकृतपणे गाड्या पार्किंग करू लागलो यामध्ये ॲम्बुलन्स ,जेसीबी, रिक्षा तसेच वडाप वाहतूक करणाऱ्या काही गाड्या रस्त्याच्या साईड पट्टीवरच लावू लागलो. त्यामुळे आम्ही हायवे विभाग आणि ज्या ग्रामस्थांनी गतिरोधक घालण्याची मागणी केली त्यांचे आभारच मानतो…….. कारण त्यांच्यामुळेच आम्हाला ही चांगली संधी मिळाली ……….असो तुम्ही दिलेल्या संधीचा आम्ही नक्कीच उपयोग करू आणि भविष्यात रस्त्याच्या साईड पट्टीवर आमची दुकाने कशी बांधता येतील……. याचा बंदोबस्त करू ……..कारण तुम्ही घातलेल्या गतिरोधक मुळे आता या ठिकाणी अपघात होणार नाही. हे आम्ही केव्हाच मनात ठरवले आणि त्यासाठीच हा अट्टाहास केला होता असंच म्हणावं लागेल.

या आधी सुद्धा गुहागर चिपळूण या महामार्गावर 43 किलोमीटर मध्ये 80 गतिरोधक होते. त्यानंतर या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आणि रस्ता रुंदीकरण झाला त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत वाढ होऊन पर्यटन वाढीस चालना मिळाली व्यवसाय धंद्याला चालना मिळाली मात्र असं असलं तरी रस्त्याच्या कडेला असणारी आमचे दुकान रस्त्याच्या कडेला असणारे आमचे अनाधिकृत पार्किंग, रस्त्याच्या कडेला असणारे आमचे गटारावरील बांधकाम रस्त्याच्या कडेला उभी राहणारे आमच्या गाड्या यांना या रुंदीकरणामुळे त्रास होऊ लागला त्यामुळे अपघातही वाढू लागले त्यामुळे हायवे प्रशासनाला आम्ही अशी विनंती करतो की तुम्ही पुन्हा एकदा 43 किलोमीटर मध्ये 80 गतिरोधक टाकाच ………म्हणजेच आमच्या मनाला समाधान वाटेल असं काहीतरी करा…….. 80 गतिरोधक तुम्ही टाकलेत तरी आम्ही काही सुधारणार नाही आम्ही रस्त्याच्या कडेला ,रस्त्याच्या गटारावर, रस्त्याच्या साईड पट्टीवर व्यवसाय करणार अनाधिकृत बांधकाम करणार मात्र तुम्ही अपघात होणार नाही यासाठी गतिरोधक टाकाच….

एक सामान्य नागरिक


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here