गुहागर तालुक्यातील मुंढर येथील चंद्रकांत भिवा तावडे म्हणजे सर्वसामान्यांचे तावडे भाऊ तर काहींसाठी तावडे साहेब यांचे नुकताच निधन झाले. यानंतर मात्र अनेकांनी आपला भाऊ हरपल्याची खंत व्यक्त केली लहानांनपासून थोर मोठ्यांपर्यंत हे सगळ्यांचे तावडे भाऊ विनोदी वृत्ती आणि प्रेमळ स्वभाव यामुळे तावडे भाऊ सर्वसामान्यांमध्ये खूपच लोकप्रिय होते.
चंद्रकांत भिवा तावडे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तावडे भाऊ हे सामाजिक वनीकरण विभागाच्या गुहागर कार्यालयात सहाय्यक लागवड अधिकारी म्हणून त्यांनी आपली सेवा पूर्ण केली. या सेवेच्या वेळेत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आपली सेवा बजावली ही सेवा ते बजावत असताना त्यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेक माणसे जोडली वयाच्या 58 वर्षी ज्यावेळी ते सेवानिवृत्त झाले त्यानंतरही त्यांनी जी जोडलेली माणसं होती ती तशीच कायम ठेवली आपल्या फावल्या वेळेत अनेकांना ते फोन करत किंवा व्हिडिओ कॉल करून त्याची विचारपूस करत असत त्यामुळे तावडे भाऊ सेवानिवृत्त झालेले असले तरी अनेकांमध्ये मिळून मिसळून असल्याचे अनेक वेळा दिसून आले. सामाजिक वनीकरण या विभागात काम करत असताना ते आध्यात्मिक मार्गाकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. गुहागर तालुक्यामध्ये जगद्गुरु नरेंद्र महाराज संप्रदायाची स्थापना त्यांनी केली त्यानंतर जगद्गुरु नरेंद्र महाराज सांप्रदायच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात त्यांनी काम केल.जवळपास 13 वर्ष जगद्गुरु नरेंद्र महाराज सांप्रदायाच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांनी काम केले. यावेळी त्यांनी जिल्ह्याभरात सांप्रदाय च्या माध्यमातून अनेक विविध काम केले आजही त्यांच्या या विविध कामांमुळे अनेक जण त्यांची आठवण काढताना दिसतात.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या कुटुंबासह अनेक ठिकाणी जात अस्त. तसेच आपल्या जुन्या जाणत्या मित्रांना परिचित व्यक्तींना जाऊन भेटत होते त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत होते. त्यामुळे असे तावडे भाऊ नेहमीच सगळ्यांना हवेहवेसे वाटणारे मात्र म्हणतात………. ना……… जो आवडतो सगळ्यांना तोचि आवडे देवाला……… त्याच म्हणीप्रमाणे आज तावडे भाऊ आपल्याला अचानक सोडून गेले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलं, सुना ,नातवंड ,दोन मुली दोन जावई असा परिवार आहे.
तावडे भाऊंच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जे दुःखद संकट ओढवले ते त्यांना सावरण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्रगती टाइम्सकडून भावपुर्ण श्रद्धांजली