या तारखेपासून शिमगोत्सवासाठी रोहा-चिपळूण मार्गावर मेमू रेल्वे

0
897
बातम्या शेअर करा

चिपळूण – शिमगोत्सवासाठी रोहा चिपळूण मार्गावर मेमू सेवा चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार ४ ते १२ मार्चपर्यंत मेमू स्पेशलच्या नियमितपणे १२ फेर्‍या धावणार आहेत. रेल्वे गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवात रोहा-चिपळूण मार्गावर चालवण्यात आलेल्या मेमू सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. चाकरमान्यांनी शिमगोत्सवातही मेमू स्पेशल चालवण्याची आग्रही मागणी केली होती. विशेषतः जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेने यासाठी सातत्याने पाठपुरावाही केला होता.
अखेर रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी कमी करून सुखकर प्रवासासाठी मध्य रेल्वेने रोहा-चिपळूण दरम्यान १२ मेमू सेवा जाहीर करत चाकरमान्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यानुसार ०१५९७/०१५९८ क्रमांकाची मेमू रोहा येथून दररोज सकाळी १११.०५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १.२० वा. चिपळूण येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात चिपळूण येथून दुपारी १.४५ वा. सुटून त्याच दिवशी सायंकाळी ४.१० वा. रोहा येथे पोहचेल. ही स्पेशल माडगाव, वीर, साापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, खेड स्थानकात थांबेल.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here