बातम्या शेअर करा

गुहागर – स्थानिक उपाशी आणि परप्रांतीय तुपाशी हे वृत्त प्रगती टाईम प्रसिद्ध करतात अनेक मान्यवरांनी प्रगती टाइम्सने या विशेष प्रकरणात लक्ष दिल्याने अभिनंदन केले.

तीन एकर जागेवर स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ती जागा मिळाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अनेक लोकप्रतिनिधींनी सांगितला.

गुहागर चिपळूण मार्गावरील चिखली येथे खादी ग्राम उद्योग मंडळाची ही तीन एकर जागा आहे. या जागेत गेल्या 30 वर्षापासून परप्रांतीय बेकरी व्यवसाय करत आहे. मात्र याबाबत कोणीच दखल घेत नव्हते अखेर प्रगती टाइम्सने याबाबत हा भयानक प्रकार उजेडात आणला यावेळी स्थानिकांसाठी असलेले जागेवर परप्रांतीय कसे असा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे आता या खादी ग्रामउद्योग मंडळातील जागा या स्थानिकांनाच मिळायला पाहिजेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

गुहागर ; खादी ग्रामउद्योग मंडळाच्या जागेवर स्थानिक उपाशी तर परप्रांतीय तुपाशी

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या या जागेवर कोणत्याही परिस्थितीत परप्रांती असता कामा नये या जागेवर स्थानिकांचा अधिकार आहे. अध्यक्षांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन स्थानिकांना त्या जागा उपलब्ध करून द्याव्यात.

  • विनोद जानवळकर मनसे तालुकाध्यक्ष

अतिशय भयानक असा प्रकार आहे. याबाबत आम्ही याआधी माहिती घेतली होती मात्र जागा शिल्लक नाही अशी उडवा उडवीची उत्तर देण्यात येतात. मात्र आता स्थानिकांच्या जागेवर परप्रांतीय हे जे प्रगती टाईम्स मी वास्तव पुढे आणले त्यामुळे सर्वप्रथम प्रगती त्यांचे धन्यवाद याबाबत आम्ही चिखली ग्रामस्थ म्हणून योग्य तो निर्णय घेऊन शासनाला हे निदर्शनास आणून देऊ

-मंगेश कदम चिखली माजी सरपंच

प्रगती टाइम्सचे वृत्त वाचले आणि धक्का बसला. याबाबत सखोल माहिती घेऊन जिल्हा खादी ग्राम उद्योग मंडळाकडे चौकशी करणार. आणि याबाबत स्थानिकांना त्या जागा उपलब्ध कशा होतील याची माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा करणार.

  • – निलेश सुर्वे भाजप तालुका अध्यक्ष

बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here