गुहागर – (यश घोणसेपाटील ) – एखाद्या व्यवसायात तन-मन लावून काम केले, ग्राहकांचा विश्वास संपादन केला आणि सातत्याने दर्जेदार सेवा दिली, तर छोट्या गावातही मोठे यश मिळवता येते. गुहागरमधील संतोष पवार उर्फ राजू यांचा प्रवास याचेच उदाहरण ठरत आहे. मुंबईतून आधुनिक मसाजचे प्रशिक्षण घेत गुहागरमध्ये सुरू केलेल्या त्यांच्या ‘स्वास्थ बॉडी मसाज सेंटर’ला आता स्थानिकांसह मुंबई, ठाणे, पुणे आणि डोंबिवली येथील ग्राहकांची पसंती मिळत आहे.
संतोष पवार हे गुहागरमधील ‘राज हेअर कटिंग सलून’च्या माध्यमातूनही परिचित आहेत. २०१८ मध्ये त्यांनी मुंबईत मसाजचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर खोपोली येथील माधवबागमध्ये आधुनिक पद्धतींचे प्रशिक्षण घेत मसाज क्षेत्रातील आपले ज्ञान अधिक विकसित केले. पुढे वडिलांचे अपघाती निधन झाल्यानंतर आलेल्या परिस्थितीत त्यांनी मसाज व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःला उभे करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच गुहागरमध्ये ‘स्वास्थ बॉडी मसाज सेंटर’ सुरू झाले. या सेंटरमध्ये बॉडी मसाज, मशीन मसाज आणि स्टीम बाथ अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुरुवातीला अनेकांना मसाज सेंटरची निवड करताना संकोच वाटत होता. मात्र, संतोष पवार यांच्या कामाची पद्धत, ग्राहकांशी संवाद आणि सेवाभाव यामुळे हळूहळू विश्वास वाढत गेला. आज परिस्थिती अशी आहे की, सुरुवातीला ग्राहकांना सेंटरकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते; आता अनेकदा ग्राहकांना मसाजसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि डोंबिवलीसारख्या शहरांमधूनही ग्राहक या सेंटरमध्ये येत असल्याचे सांगितले जाते. स्थानिक नागरिकांनाही या सेवांचा लाभ मिळत असून, शहरातील आधुनिक मसाज सुविधा गावात उपलब्ध झाल्याने त्यांना सोयीचे ठरत आहे.
गावात आधुनिक मसाज सेंटर उभारणे आणि त्याला ग्राहकांची पसंती मिळवून देणे हे सहज शक्य झालेले नाही. त्यासाठी संतोष पवार यांनी घेतलेले प्रशिक्षण, व्यवसायातील सातत्य आणि ग्राहकांना दिलेले महत्त्व या गोष्टी निर्णायक ठरल्या आहेत. त्यांच्या प्रवासातून एखाद्या व्यवसायात मनापासून काम केले, तर ग्राहकांचा विश्वास आणि यश दोन्ही मिळवता येते, हे अधोरेखित होते. गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठीही हे मसाज सेंटर एक पर्याय ठरत आहे. त्यामुळे गुहागरमध्ये आलात, तर ‘स्वास्थ बॉडी मसाज सेंटर’ला भेट देऊन तेथील सेवा अनुभवण्याची संधी नक्कीच घेता येईल. शहरातील आधुनिक मसाज सुविधांचा अनुभव आता गावातही उपलब्ध होत असल्याने गुहागरच्या व्यावसायिक क्षेत्रात संतोष पवार यांच्या या उपक्रमाची वेगळी ओळख निर्माण होत आहे.
मेहनत, जिद्द आणि सेवाभावातून गुहागरात उभे राहिले ‘स्वास्थ बॉडी मसाज सेंटर’
255
















