चिपळूण – चिपळूण शहरातील पेठमाप मुकादम मोहल्ला येथे एका महिलेचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. त्यामुळे शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार सायंकाळी हा प्रकार उजेडात आला.
पेठमाप मुकादम मोहल्ला येथील गनी मुकादम यांच्या घरांमध्ये संबंधित भाडेकरू महिला राहत होती. या महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला आहे.काल सायंकाळी ७ नंतर चिपळूण पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, उशिरापर्यंत मृत महिलेचे नाव समजू शकले नाही.या महिलेने जाळून घेत स्वतः आत्महत्या केली की, तिला जाळून मारण्यात आले, याबाबत संशय व्यक्त होत आहे, घातपाताचा संशय व्यक्त होत असून, पोलीस घटनास्थळी जाऊन चौकशी करत आहेत.ही महिला नेमकी कोण होती, ती एकटीच राहत होती का, ती मूळची कोणत्या गावातील आहे, ही घटना घडली त्यादरम्यान तिच्याकडे कोणी आले होते का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यादृष्टीने पोलीस माहिती घेत असून, लवकरच ही माहिती पोलीस पुढे आणतील अशी अपेक्षा आहे.