चिपळूण – चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथे चक्क भरभर वस्तीत लादी उत्पादनाचा कारखाना थाटण्यात आला आहे.
विशेष म्हणजे कोणतीही परवानगी न घेता हा कारखाना सुरू करण्यात आल्याने मिरजोळी ग्रामपंचायतीने कारवाईची नोटीस बजावली आहे. तर परवानगीसाठी अर्ज केल्याची कारखानदाराचे म्हणने आहे, त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे. चिपळूण शहरापासून जवळच असलेल्या मिरजोळी ग्रामपंचायत हद्दीतील साखरवाडी येथे भर वस्तीत लादी उत्पादनाचा कारखाना गेले कित्येक दिवस सुरू आहे. प्रदूषण तसेच आवाजाचा त्रास वाढल्याने येथील ग्रामस्थांनी तक्रार करण्यास सुरुवात केली त्यामुळे मिरजोळी ग्रामपंचायतीने या विषयात लक्ष घातले. चौकशी केली असता हा कारखाना पूर्ण पूर्णतः अनधिकृत असल्याचे लक्षात आले. ग्रामपंचायतीने संबंधिताना थेट नोटिसच पाठवली, परंतु त्या नोटीसला चक्क केल्याची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे मिरजोळी ग्रामपंचायत आता या विषयात ॲक्शन मोडवर आली आहे. विशेष म्हणजे आपण परवानगीसाठी प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज केला असल्याचा खुलासा कारखानदाराकडून करण्यात आला आहे. परंतु याबाबत माहिती घेतली असता प्रांत कार्यालयाच्या टपाल मध्ये एक अर्ज देण्यात आला असून फक्त साठा आणि विक्री यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. त्या अर्जावर कोणतीच कार्यवाही अद्याप झाली नसल्याची माहिती उपलब्ध झाली त्यामुळे भरवस्ती सुरू असलेला हा कारखाना अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे.मिरजोळी ग्रामपंचायत या कारखान्यावर कारवाई करण्याची तयारी करत आहे ३ नोव्हेंबर पर्यंत कारखाना बंद करा अन्यथा कारवाई केली जाईल अशी स्पष्ट नोटीस ग्रामपंचायतीने बजावली आहे तसेच पोलीस बंदोबस्त मिळवण्यासाठीही ग्रामपंचायतीने प्रयत्न सुरू केले आहेत.