मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात टँकर उलटला,मार्गावरील वाहतूक ठप्प

0
207
बातम्या शेअर करा

खेड – मुंबई – गोवा महामार्गावर मंगळवारी सायंकाळी ज्वालाग्राही पदार्थ वाहतूक करणारा टँकर भोस्ते घाटात एका अवघड वळणावर उलटला. त्‍यामूळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर भोस्ते घाटात मंगळवारी सायंकाळी अवघड वळणावर घाट उतरणारा ज्वालाग्राही द्रव वायू वाहतूक करणारा टँकर उलटला. यामूळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व वाहतूक थांबवण्यात आली आहे.घाटातील मुंबईच्या व गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक शिव व लवेल मार्गे वळवण्यात आली आहे. घाटात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. टँकर मधील वायू गळती होत असल्याने या टँकर परिसरात पाचशे मीटर परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अपघातामुळे सायंकाळी मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक खाेळांबा झाला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here