कोकणकन्या झाली ‘सुपरफास्ट’, ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात बदल

0
65
बातम्या शेअर करा

चिपळूण – कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस आता सुपरफास्ट झाली आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होणार आहे.

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्ये आणि क्रमांकामध्ये झालेल्या बदलाची माहिती पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे. २० जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या एक्स्प्रेस ही सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. सुपरफास्ट श्रेणीत समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसचा क्रमांक बदलला असून २०१११ आणि २०११२ या क्रमांकांसह धावणार आहे. सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्याने कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकामध्येही बदल झाला आहे. मुंबईवरून मडगावसाठी निघणारी २०१११ ही कोकणकन्या एक्स्प्रेस सीएएसएमटी स्थानकातून रात्री ११.०५ वाजता निघेल. त्यानंतर ही गाडी दादर (११.१७), ठाणे (११.४५), पनवेल (१२.२५), खेड (३.०४), चिपळूण (३.३०), संगमेश्वर (४.०२), रत्नागिरी (४.४५), राजापूर (५.५०), वैभववाडी (६.१०), कणकवली (६.४२), सिंधुदुर्ग (७.००), कुडाळ (७.१२), सावंतवाडी (०७.३२), पेडणे (७.५६) आणि मडगाव (९.४६) येथे पोहोचेल. तर मडगावहून मुंबईकडे निघणारी २०११२ ही गाडी मडगावहून संध्याकाळी ७.०० वाजता निघेल. ही गाडी सावंतवाडी ( रात्री ८.३६), कुडाळ (रात्री ९.००), सिंधुदुर्ग (रात्री ९.१२), कणकवली (रात्री ९.२८), वैभववाडी ( रात्री ९.५६), राजापूर (रात्री २२.१४), रत्नागिरी (रात्री २३.१५), चिपळूण (रात्री १२.२८), खेड (रात्री १२.५५), पनवेल ( पहाटे ३.५५), ठाणे (पहाटे ४.४२), दादर (पहाटे ५.१२), मुंबई सीएसएमटी (पहाटे ५.४०) वाजता पोहोचेल.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here