पोस्कोच्या गुन्ह्यात आरोपीला 20 वर्षांची शिक्षा

0
551
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अतिप्रसंग करणाऱ्या तरुणास येथील विशेष न्यायाधीशांनी २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

अभिजित गौतम जाधव असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सकारी पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील म्हणून अतिरिक्त सरकारी अभियोक्त पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले, तर विशेष न्यायाधीश एन.एस. मोमीन यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली आहे.दि. ११ मे २०१८ रोजी दुपारी १ वाजता पीडित ११ वर्षाची मुलगी घरी एकटीच होती. आई मुंबईला गेली होती, तर वडील कामानिमित्ताने बाहेर गेले होते. ही संधी साधून अभिजित गौतम जाधव हा पीडीत मुलीच्या घरी गेला. तिच्यावर जबरदस्तीने अतिप्रसंग केला. या झाल्या प्रकाराची माहिती मुलीने चुलत काकीला सांगितली. काकीने मुंबईवरून आईला बोलावून घेतले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी तिच्या आईने सावर्डे पोलीस स्थानकात घटनेची फिर्याद दिली. फिर्यादीनुसार मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत भा.द.वी कलम ३७६ अन्वये दोषारोप पत्र पाठविण्यात आले होते. याप्रकरणी एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. पुराव्याअंती अतिरिक्त सत्र न्यायाधीश चिपळूणचे विशेष न्यायाधीश एन.एस. मोमीम यांनी आरोपीस भा.द.वि. कलम ३७६ अ.ब.अन्वये दोषी ठरवले. आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने साधी शिक्षा सुनावली. तसेच भा.द.वि.कलम ५०६ अन्वये २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. या घटनेचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी केला होता. पैरवी अधिकारी म्हणून कांबळे व जानवलकर यांनी काम पाहिले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here