0

गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील मदिना बेकरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा घालत ही बेकरी पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी हे मध्यवर्ती ठिकाण याच ठिकाणी 2007 पासून मदीना बेकरी सुरू आहे. या बेकरी मध्ये खारी, टोस्ट ,बटर ,इतर पदार्थ तयार केले जातात तसेच ते संपूर्ण तालुक्यात विक्रीला जातात या पदार्थांबाबत अनेक वेळा स्थानिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या. नुकताच इथून घेतलेल्या केकवर बुरशी आल्याचे येथील स्थानिकांच्या निदर्शनास आले यावेळी स्थानिक पत्रकारांनी याबाबत उठाव केला असता आपल्याकडून चूक झाल्याचे मदिना बेकरीचे मालक यांनी कबूलही केले. मात्र या बेकरीचे हे असे प्रकार वाढल्याने अखेर अन्न व औषध प्रशासनाला याबाबत माहिती दिली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी छापा टाकत येथील मुदत संपलेल्या जवळपास एक लाख 34 हजार किमतीचा माल जप्त करण्यात आला त्याचप्रमाणे ज्या खाद्यपदार्थांवर तारीख नव्हती ते पदार्थ नष्ट करण्यात आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन ठाणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त दिनानाथ शिंदे यांच्या आदेशाने रत्नागिरी येथील अन्नसुरक्षा अधिकारी विजय पाचपुते यांनी ही कारवाई केली. यावेळी या बेकरीमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले आणि मुदतबाह्य पदार्थही आढळून आले त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत या बेकरीचे उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बेकरीमध्ये परप्रांतीय यांचा भरणा ही मोठ्या प्रमाणात दिसून आला याबाबत त्यांची माहिती गोळा करण्याचं काम गुहागर पोलीस स्टेशन सुरू आहे.

गुहागर तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे त्या विभागाचे सर्वत्र कौतुक होते अशाच प्रकारची तालुक्यातील सर्व बेकरीची तपासणी करावी अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here