शिवसेनेला धक्का; माजी जि. प. उपाध्यक्ष विश्वास सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
199
बातम्या शेअर करा

चिपळूण – आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीत आघाडी झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू, असे प्रतिपादन चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सावर्डे येथे आयोजित बैठकीत केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते विश्वास सुर्वे यांनी या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या तालुक्यामध्ये पक्ष संघटना वाढवणे हा उद्देश असून येणारी स्थानिक स्वराज्य संस्था व नगर परिषद निवडणुकीमध्ये आघाडी होऊ अथवा न होऊ. मात्र, स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा. पंचायत समिती आणि नगर पालिकेमध्ये आपल्या पक्षाचा सभापती व नगराध्यक्ष बसतील असे काम करूया, असे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण ५७ हजार मतांनी मागे होतो. तरीसुद्धा न डगमगता विधानसभा निवडणुकीमध्ये आपण विजय खेचून आणला. आघाडीसाठी तालुकाध्यक्षांनी मित्र पक्षांशी बोलणी करून घ्यावी. महाविकास आघाडीचे सरकार असताना तालुक्यामध्ये अनेक विकास कामे करण्यात आली. त्यामध्ये मतदार संघातील जनता समाधानी असून प्रलंबित विकासकामे पूर्ण करू, अशी ग्वाही यावेळी दिली. विकास कामे केली म्हणून विजय मिळतो असे नाही. जनसंपर्क वाढवा असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना असा सल्ला दिला. तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, माजी सभापती सुरेश खापले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, माजी सभापती शौकत मुकादम, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, खेर्डीचे सरपंच दशरथ दाभोळकर, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश कानसे, रोहित गमरे, समीर पवार, प्रणिता घाडगे आदींनी मनोगते व्यक्त केली.यावेळी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अशोक कदम, डॉ. राकेश चाळके, मुराद अडरेकर, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग माळी, तालुका सरचिटणीस रमेश राणे, माजी सभापती, पूजा निकम रिया कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, समीर काझी, सूर्यकांत खेतले, राजाभाऊ खेतले, दीपिका कोतवडेकर, शिवानी पवार, वर्षा जागुष्टे, जे. के शिंदे, नंदू शिर्के, मयूर खेतले,अनिल चिले, विकास गमरे, कादिर परकार, महिला आघाडी तालुकाध्यक्ष जागृती शिंदे मोबीन पाटणकर, अनिल चिले, दिनेश शिंदे, स्वप्नील शिंदे, विकास गमरे, सुधीर भोसले, विकास पवार, शौकत माखजनकर, शांताराम बागवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here