जगाशी स्पर्धा करण्यासाठी तयार राहा : शेखर निकम लब्बैक कमिटीतर्फे सावर्डेत दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
89
बातम्या शेअर करा

सावर्डे : विद्यार्थ्यांची स्पर्धा आता सीमित राहिलेली नाही. तुमची स्पर्धा जगाशी असल्याने त्यासाठी तयार राहा. उंच भरारी घ्यायची असेल, तर पंखांमध्ये बळ येण्यासाठी बालपणापासूनच सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध पद्धतीने करणे गरजेचे आहे.

त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी रविवारी (ता. 7) येथे केले. सावर्डे येथील लब्बैक कमिटीतर्फे दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार निकम बोलत होते.

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या भाऊसाहेब महाडिक सभागृहात रविवारी सायंकाळी 4 वाजता हा गुणगौरव सोहळा झाला. मौलाना अल्ताफ साहब यांच्या तिलावत-ए-कुरआनने सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी आमदार निकम यांनी लब्बैक कमिटीच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून मुलांना प्रोत्साहन द्यायचे काम या गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून लब्बैक कमिटीतर्फे केले जात आहे. कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कोरोना, महापूर यांसारख्या अनेक अडचणींच्या वेळी संघटीतपणे मदतीचे कार्य करतात. या माध्यमातूनच समाज घडत असतो. याच उद्देशाने लब्बैक कमिटीचे कार्य अखंडितपणे सुरू आहे.

यावेळी सावर्डेच्या सरपंच सौ. समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, शिक्षण विस्तार अधिकारी राजअहमद देसाई, जमातीचे अध्यक्ष रफीक मुल्लाजी, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश सावर्डेकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक रफीक मोडक, अखलाक शेख, शौकत माखजनकर, शिवसेनेचे प्रदीप चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा लब्बैक कमिटीचे अध्यक्ष मजिद मुल्लाजी, ताहीर गोलंदाज, तहसीम मुल्लाजी, इफ्राज मुल्लाजी, राहील गोलंदाज, अरफात काद्री, तौफिक पटेल, फैज खान, हिदायत मुल्लाजी, उजमा मुल्लाजी, फजिलत खान, तौफिक काद्री, जावेद काद्री, इस्माईल हजवाने, जुनेद मंडिपिरा, महमदअली अडरेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. लब्बैक कमिटीने राबविलेल्या विविध उपक्रमांचा स्लाईड शो यावेळी दाखवण्यात आला. त्यानंतर दहावी, बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

लब्बैक कमिटीचे अध्यक्ष मजिद मुल्लाजी यांनी प्रास्ताविक, तर उपाध्यक्ष गुलजार गोलंदाज यांनी सूत्रसंचालन केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी लब्बैक कमिटीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली……………

प्रशांत यादव यांच्याकडून कौतुक

चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव काही अपरिहार्य कारणास्तव बाहेरगावी गेल्याने ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. एकीकडे देशभर काही विघ्नसंतोषी जाती-धर्माच्या भिंती उभ्या करत असताना लब्बैक कमिटीच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक सलोखा जपण्याचे जे कार्य सुरू आहे ते कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत त्यांनी कमिटीचा गौरव केला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here