बातम्या शेअर करा

खेर्डी – (सुरेश पवार ) – लॉक डाऊन मधील पगाराचा गुंता न सुटल्याने गेले काही दिवस खड्पोली एमआयडीसी मधील जे के तालाबोट कंपनीमध्ये कामगार व व्यवस्थापन यांच्यात सूरु असणारा हा वाद चिघळला आणि कंपनीने दिलेल्या प्रस्तावाला कामगार यांनी विरोध दर्शविल्याने कंपनी व्यवस्थापन यांनी गेट बंद करत या कामगारांना प्रवेश नाकारला आहे. कंपनीच्या या धोरणाविरोधात कामगार यानी गेट समोरच्या ठिय्या अदोलन सुरू केले आहे.

चिपळूण तालुक्यातील खड्पोली एमआयडीसी मधील जे के तालाबोट या कंपनीमध्ये 166 कामगार कायमस्वरूपी व अन्य कंत्राटी पद्धतीने 84 असे 250 कामगार काम करीत आहेत. यातील बहुतांशी कर्मचारी हे स्थानिक आहेत लॉक डाऊन कालावधीतही या कामगारांनी पूर्णवेळ काम करीत कंपनीसाठी मोठे योगदान दिले मात्र त्या महिन्यात कर्मचारी यांना 50 टक्के वेतन देण्यात आले त्यामुळे संबंधित कामगार यांनी दोन दिवस संप पुकारून आपल्या विविध मागण्याकडे कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला अशातच कंपनीने शनीवारी रात्रपाळीसाठी आलेल्या कामगार यांना कंपनी बाहेर पाठवत कंपनीचे काम थांबवले. तसेच गेटला टाळे लावून घेतले हे कामगार इंटक संघटनेच्या सूचनेनुसार संबंधित कामगार यांनी कंपनी विरोधात आवाज उठवत कंपनीच्या गेट समोर ठिय्या मांडला जोपर्यंत पूर्ण पगार मिळत नाही किंवा 50 टक्के पगारातील उर्वरित रक्कम भविष्यात मिळेल अशी हमी मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करणार अशी भूमिका या कामगार यांनी घेतली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here