चिपळूण – चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे काही नागरिक हे सरकारी नोकर, व्यावसायिक , व आर्थिक दृष्ट्या श्रीमंत असताना सुद्धा शासनाला फसवत असून शासनाच्या दारिद्र्यरेषेखालील कार्डचा उपयोग करून शासनाची फसवणूक करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
मार्गताम्हाणे येथील सिताराम लक्ष्मण घाणेकर माजी उपसरपंच यांनी याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना तक्रार केली आहे. यामध्ये मार्गताम्हणे गावातील काही नागरिक हे सरकारी नोकर, व्यापारी तसेच आर्थिक दृष्ट्या श्रीमंत असताना सुद्धा शासनाला फसवत असून शासनाच्या दारिद्र्यरेषेखालील कार्डचा उपयोग करून शासनाची फसवणूक करत असल्याची तक्रार केली आहे. दारिद्र रेषेखालील रेशन कार्ड वर असणाऱ्या सर्व सुविधा हे ग्रामस्थ घेत असून अशाप्रकारे शासनाची घोर फसवणूक करत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. राज्य शासन दारिद्र रेषेखालील कार्ड असलेल्या व्यक्तीला म्हणजे त्या कार्डवर नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू हे मोफत देत असते. याचाही हे फायदा घेत आहेत. तसेच राज्य शासनाचा अनेक योजनांचा फायदा हे घेत आहेत. या सर्व जणांची नावासह तक्रार घाणेकर यांनी केली आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक करणाऱ्या या नागरिकांना विरोधात आता प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडेच संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. शासनाच्या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या या नागरिकांची शोध मोहीम घेऊन ज्याला खरोखर गरज आहे. अशाच व्यक्तीला त्याचा फायदा देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
















