चिपळूण -चिपळूण तालुक्यातील ढाकमोली येथे घराच्या पाठीमागील बाजूस जंगली झाडांच्या फांद्यानी कंपाऊंड घातले म्हणून याचा राग मनात धरून ढाकमोली येथे ७४ वर्षीय वृद्धाने एकावर कोयतीने हल्ला केला असून यामध्ये ३४ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला सावर्डे येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी त्या हल्लेखोरासह तिघांविरोधात सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अटक करण्यात आली आहे. या तिघांना येथील न्यायालयात हजर केले असता १७ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.