चिपळूण ; वाशिष्ठी डेअरीच्या ईटीपी प्लान्टचे भूमिपूजन !

0
290
बातम्या शेअर करा

कोकणातील शेतकन्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्धप्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ७ सप्टेंबर २०२१ रोजी चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूणचे संस्थापक व अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण यांच्या वाढदिनी त्यांच्याच शुभहस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या प्रकल्पाच्या ईटीपी प्लांटचे भूमिपूजन शुक्रवार, दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. ना. सुनिल केदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. नाना पटोले यांच्या शुभहस्ते आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूणचे संस्थापक व अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

मा. सुभाषराव चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील मोठा पल्ला गाठला. १९ ऑक्टोबर १९९३ रोजी नोंदणी झालेल्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने आज महाराष्ट्रभर आपला विस्तार केला आहे. पारदर्शक कारभार आणि सभासद, कर्जदार, ठेवीदारांचा विश्वास दृढ असल्यानेच हे सारे शक्य झाले. याच विश्वासाच्या बळावर आत्मविश्वास आणखी वाढत गेला आणि कोकणात सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणखी आर्थिक बळ देण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी, इथल्या तरुणांना रोजगाराची संधी खुली करण्यासाठी मा. चव्हाण साहेबांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांना दूध चळवळीत सक्रिय करण्याचे ठरवले आणि मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. या प्रकल्पाची संकल्पना आकार घेऊ लागली. कोकणातील शेतकऱ्यांची मानसिकता बदलून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकन्यांशी स्पर्धा करणारे शेतकरी आपल्या कोकणात तयार व्हावेत, हे चव्हाण साहेबांचे स्वप्न आहे. चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे काळकाई मंदिराजवळ मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स त्यातूनच या प्रकल्पाचे ७ सप्टेंबर २०२१ रोजी भूमिपूजन झाले आणि मा. चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्थानिक शेतकऱ्यांसह हजारो लोकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या वाटा निर्माण होणार आहेत.

या प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या प्रकल्पाच्या ईटीपी प्लांटचे भूमिपूजन १८ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. ना. सुनिल केदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. ना. नाना पटोले यांच्या शुभहस्ते व चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूणचे संस्थापक व अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत होत आहे. आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि विश्वास या दुग्धप्रकल्पासाठी कायम राहाव्यात

वाशिष्ठी डेअरीचे प्रॉडक्टस्

दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड पनीर, तूप, सुगंधी दूध या दुग्धजन्य पदार्थांचेही उत्पादन वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे. अतिशय दर्जेदार आणि कोणतीही तडजोड न करता तयार होणारे हे दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवतील.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

● प्रकल्पाच्या आखणी, नियोजनासाठी अनुभवी प्रोजेक्ट कन्सल्टंट, डेअरी कन्सल्टंट आणि टेक्निकल टीमची नेमणूक

• प्रकल्पासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा अत्याधुनिक व स्वयंचलित • दूध संकलनासाठी १० गावे मिळून एक कलेक्शन सेंटर

• महत्त्वाच्या ठिकाणी विभागवार दूध वितरण केंद्रे उभारणार

प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांना दर आठवड्याला दुधाचे पैसे अदा केले जातील. • शेतकऱ्यांना गाई-म्हशींचा पुरवठा, खाद्याचा पुरवठा आणि पशुवैद्यकीय सुविधांचा पुरवठा • शेतकऱ्यांसह हजारो तरुणांना रोजगाराची संधी प्रकल्पाच्या शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी

स्वतःचे पशुवैद्यकीय अधिकारी

• प्रकल्पाच्या माध्यमातून अत्यल्प दरात शेतकऱ्यांना पशुखाद्य व चान्याचा पुरवठा • प्रकल्पाबरोबरच दूधसंकलन क्षेत्रात दुधाचा दर्जा तपासण्यासाठी अद्यावत लॅबोरेटरीज मोबाईल व्हॅन

सर्वसामान्यांचा प्रकल्प !

हा प्रकल्प खासगी असला, तरी सहकार तत्त्वावरच या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे पारदर्शक कारभार आणि आपलासा वाटणारा प्रकल्प म्हणून अल्पावधीतच हा प्रकल्प संपूर्ण कोकणात आदर्शवत ठरेल. मा. सुभाषराव चव्हाण साहेब यांनी प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात सांगितले होते, की हा प्रकल्प सर्वसामान्य घटकांसाठी असेल. साहेबांचा हा विश्वास आणि या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी प्रामाणिकपणे झटणारे हात यामुळे नक्कीच हा प्रकल्प यशाचे शिखर गाठेल यात शंका नाही.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here