वसई – मुंबईत राहणाऱ्या युवतीला अश्लील मेसेज करून ब्लॅकमेल करणाऱ्या गुहागरमधील युवकाच्या विरोधात वसई मधील तुळींज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.शृंगारतळी येथे वास्तव्य करणाऱ्या त्या युवकाचे नाव प्रसाद कुष्ठे असे असून त्याच्या विरोधात कलम 354 (ड) 501 आणि 506 असा गुन्हा दाखल झाला आहे.
महाविद्यालयात ओळख असलेल्या एका युवतीशी प्रसाद चे आधी भावा बहिणी प्रमाणे नाते होते….यानंतरच्या काळात त्याचे त्या युवतीच्या घरी येणे जाणे वाढू लागले होते.दरम्यानच्या काळात त्या युवतीचे ठरलेले लग्न मोडण्याचे काम याच प्रसादने केल्याचेही पीडित युवतीने तक्रारीत म्हटले आहे, एवढ्यावरच न थांबता प्रसाद कुष्ठे या तरुणाने पीडित युवतीला फोन वरून अश्लील मेसेज पाठवून अनेक धमक्याही दिल्याची माहिती पोलीस ठाण्यात पुराव्यासह सादर केल्यानंतर वसई पोलिसांनी प्रसादच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा सगळा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याचा अंदाजही पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.