गुहागर – गुहागर तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र तळवली नूतन इमारतीचे उदघाटन गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या
शुभहस्ते रविवार 20 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल परब, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव खासदार सुनील तटकरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित लाभणार आहे. त्याप्रमाणे या कार्यक्रमासाठी श्री. रामास्वामी एन. (आयुक्त तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान), डॉ. बी एन. पाटील, (जिल्हाधिकारी, रत्नागिरी) डॉ. इंदूराणी जाखड (मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद रत्नागिरी) उदय बने( उपाध्यक्ष तथा आरोग्य व बांधकाम सभापती जिल्हा परिषद रत्नागिरी), दीपाली भाईक (अधीक्षक, अभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान) डॉ.दुर्गादास पांडे( उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर), पूर्वी निमुणकर (सभापती,पंचायत समिती गुहागर) सिताराम ठोंबरे( उपसभापती पंचायत समिती गुहागर), प्रतिभा वराळे,( तहसिलदार), श्रीमती विभावरी विनायक मुळे( माजी सभापती, पंचायत समिती गुहागर) अमोल भोसले( गटविकास अधिकारी, पंचायत समिती गुहागर )अमर सोनवणे( कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय आरोग्य अभियान) डॉ.घनश्याम जांगिड, (तालुका आरोग्य अधिकारी गुहागर),प्रियांका पानसरे (उपअभियंता, रा.आ.अ. जि. प. रत्नागिरी),मयुरी शिगवण( सरपंच, ग्रामपंचायत तळवली) अनंत डावल (उपसरपंच,ग्रामपंचायत तळवली) डॉ. पंकज देशमुख( वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली) डॉ. मयुरी देसाई (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली), अमित हांडे( वास्तुविशारद, ओरिजिन असोसिएट पुणे ), अभिजित जाधव (कंत्राटदार, चिपळूण) तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तळवळी अंतर्गत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व रुग्ण कल्याण समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र तळवलीच्या रुग्ण कल्याण समिती यांनी केले आहे.