गुहागर ; शिवसेना आयोजित तालुकास्तरीय गणेशोत्सव सजावट स्पर्धेत परचुरी येथील देखाव्याला मिळाला प्रथम क्रमांक

0
536
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर शिवसेना, युवा सेना व गुहागर विधानसभा समन्वयक विपुल लक्ष्मण कदम पुरस्कृत आयोजित गुहागर तालुका मर्यादित पर्यावरण पुरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आज पाटपन्हाळे येथील शांताई रिसॉर्ट, येथे संपन्न झाला.

या तालुकास्तरीय गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सत्यवान दर्देकर (परचुरी), द्वितीय क्रमांक मकरंद विचारे (वरवेली), तृतीय क्रमांक समीर महाडिक, (वरवेली), चतुर्थ क्रमांक सोहम पवार (देवघर), पंचम क्रमांक यश विजय गुजर, (देवघर) यांना रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या ऑनलाइन सजावट स्पर्धेचे परीक्षण कमर्शियल आर्टिस्ट सत्यजित भोसले यांनी केले. या बक्षीस वितरण समारंभासाठी शिवसेनेचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, पक्ष निरीक्षक अनुराग उत्तेकर, युवा सेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे, गुहागर तालुका महिला प्रमुख ज्योत्स्ना काताळकर, गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे, प्रदीप सुर्वे, गुहागर विधानसभा 72 गाव युवासेना तालुका प्रमुख विक्रांत चव्हाण, अमोल गोयथळे, संतोष आग्रे, सागर गुजर, महेश जामसुतकर, योगेश कदम, कुणाल देसाई, सुशील जंगम उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here