एखादे काम करायला निघाले, पण लगेच ते विसरून आपण कशाला निघालो तेच आठवेनासे होते… पण त्यावर घरच्या घरी उपाय करता येतील.
- 4 ते 5 बदाम रात्री भिजत घालून ठेवायचे आणि सकाळी त्याची साल काढून दुधाबरोबर उकळून प्यायचे. या दुधात थोडे मध घातले तर उत्तम.
- जेवणात माशाचे तेल आणि खोबरेल तेल जास्त प्रमाणात असेल तर फायदा होईल.
- 6 ते 7 काळीमिरींमध्ये थोडे लोणी आणि साखर मिसळून ते मिश्रण दररोज खाल्ल्याने मेंदू झटपट काम करू लागतो.
- दिवसातून किमान दोनवेळा आवळ्याचे चूर्ण खाल्ल्यानेही नक्कीच फायदा होतो.
- बडीशेप कुटून साफ करून घ्यायची. साफ केलेली बडीशेप सकाळ-संध्याकाळ एकेक चमचा दुधाबरोबर घेतल्यानेही परिणाम दिसू लागेल.
- म्हटलं जातं की सकाळी अनशेपोटी आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने मेंदू मजबूत आणि तीव्र होतो.
- गाईच्या तुपाने काही दिवस डोक्यावर मालीश केल्यामुळेही स्मरणशक्ती वाढते.
- कांद्याच्या बिया (कलौंजी) अर्धा चमचा मधाबरोबर घेतल्याने मेंदू तीव्रतेने काम करतो. हे मिश्रण आठवडय़ात किमान दोनदा घ्यायचे.
- ब्रह्मी आणि अक्रोड दररोज खाल्ल्याने मेंदूचा फायदा होतो. स्मरणशक्ती वाढते.