कोणत्याही कारणाने नोकरी सोडण्याची वेळ आली तर मानसिक त्रास होणे स्वाभाविक आहे. कारण, या स्थितीचा आर्थिक उत्पन्नावर परिणाम होतो. अशावेळी लवकरात लवकर दुसरी नोकरी पाहण्यासाठी घाई केली जाते. यासाठी आत्मविश्वास डळमळीत नको
उणिवांचा शोध घ्या : नव्याने करिअर सुरू करताना तत्पूर्वी सर्वांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. आपल्या अंगी असणार्या उणिवा, दोष यांचा शोध घ्या. या उणिवा दूर केल्यास आपल्या प्रगतीतील अडथळे कमी होतील. गरज भासल्यास नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि आपली प्रतिभा अधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करा.
अपडेट राहा : नोकरी गमावल्यानंतरही नवनवीन गोष्टी शिकण्याबाबत आग्रही राहा. सध्याच्या काळानुसार स्वत:ला अपडेट करत राहा. आपल्या कार्यक्षेत्राशी निगडीत
संकटाकडे संधी म्हणून पाहा : आपले आयुष्य शेअरबाजाराप्रमाणे आहे. ते कधीच स्थिर नसते. शेअर बाजाराची काल उच्चांकी तर आज निच्चांकी पातळी असते. परंतु, दीर्घकाळाचा विचार केल्यास शेअर बाजार हा सर्वांनाच लाभदायी ठरला आहे. या आधारावर जीवनातील चांगले वाईट दिवस हे संधी म्हणूनच पाहावयास हवे. विद्यमान नोकरी हा आपला शेवटचा टप्पा नव्हता, हे लक्षात घ्यायला हवे.