बातम्या शेअर करा

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आहे. त्या मुंबईमधील लोकसंख्या कमी करणे हेच सध्या एकमेव कारण आहे. जेणेकरून लोकसंख्या कमी होऊन कोरोना संक्रमण होणारी रुग्ण संख्या कमी होईल. आणि मुंबईमधील कोरोनाचा धोका कमी होईल. त्यामुळे मुंबईमधील लोकसंख्या कमी करणे हा एकमेव उपाय आहे. जर मुंबईतील लोकसंख्या कमी झाली नाही. तर ही आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये आपण तरी वर्ष 2020 मध्ये जाऊ की नाही. हे अद्याप सांगता येणार नाही त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर मुंबईमधील लोकसंख्या कमी करावी हा एकच उपाय त्याच्यावर आहे असे मला वाटते.

कोकणातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील आर्थिक व्यवहार हे मुंबईवर अवलंबून आहेत. जर मुंबई ठप्प झाली तर त्याचे दुष्परिणाम हे खूप बिकट आहे. त्यामुळे मुंबई वाचन आज काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील प्रत्येक शहरातील प्रत्येक राज्यातील जे कोणी मुंबई मध्ये असतील अशांना त्यांच्या गावात जाण्याची परवानगी द्यावी जेणेकरून माझी मुंबई वाचेल. महाराष्ट्रातील व कोकणातील ज्या गावासाठी ज्या चाकरमान्यांनी अनेक वेळा आर्थिक मदत केली. गावातील मंदिर उभारणे, गावातील एकादे सामाजिक काम करणे, गावात विकास निधी आणणे, एवढेच काय तर मुंबईत राहून सुद्धा गावी मंडळ स्थापन करून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सुद्धा आहे हेच मुंबईकर नेहमीच पुढे आलेत. हे मुंबईकर नेहमीच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत वेळात वेळ काढून गावी येतात. आणि त्या लोकप्रतिनिधींना निवडून सुद्धा देतात. अशा या मुंबईकरांना आता वेळ आहे. ती आपल्या मदतीची तेव्हा त्या मुंबईकरांना आपल्या गावी येऊ द्या. जेणेकरून घुसमटलेल्या मुंबई मधून ते गावी येऊन मोकळा श्‍वास घेतील. आणि पुन्हा एकदा गावाच्या विकासाबरोबरच ते मुंबई कोरोना मुक्त होईल पर्यत गावी राहतील असं मला वाटतं.

मुंबई मेरी जान हें , मुंबई मेरी शान हें

लक्ष्मीकांत घोणसेपाटील 


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here