बातम्या शेअर करा

असा प्रश्न विचारण्याचे कारणही तसंच आहे. कारण राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाने थैमान घातले. राज्यभरात अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण अनेक शासकीय दवाखान्यात दाखल होत आहेत. मात्र आज आपण ज्या शासकीय दवाखान्यावर अविश्वास दाखवत होतो. आणि आपल्या गावातल्या आपल्या शहरातल्या , आपल्या शेजारील नामांकित अशा खाजगी डॉक्टरकडे उपचार करत होतो. त्यातील काही डॉक्टरांनी कोरोना आजार आलाय म्हणून आपले रुग्णालय बंद केले. ज्या वेळेला राज्यात परिस्थिती चांगली होती त्यावेळेला याच डॉक्टरनी तुम्हाला ताप आला म्हणून आमकी तपासणी करा, तमकी तपासणी करा. तुम्हाला छातीत दुखतंय हा एक्स-रे काढा 15 दिवसांनी पुन्हा एकदा तपासणी करा असं सांगून तुमच्याकडून लाखो रुपये उकळले. आणि आज तेच नामांकित डॉक्टर आपले रुग्णालय चक्क बंद करून घरी बसलेत. मग मला सांगा ज्या खासगी डॉक्टरांकडे आपण फॅमिली डॉक्टर म्हणून वर्षानुवर्षे पाहत होतो. त्यांनी आता कोरोनाला घाबरून रुग्णालय बंद केले आहेत. आता आपल्या घरातला जर कोणी आजारी पडला तर आता आपण फॅमिली डॉक्टरकडे न जाता सरकारी दवाखान्यात जातोय. मग मला सांगा एवढे दिवस तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुमच्या वॉर्डात तुमच्या शेजारी जे डॉक्टर दवाखाना थाटून आहेत किंवा होते. ते खरे डॉक्टर होते का ? असा प्रश्न आता मला पडला.

राज्य शासनाने सर्व शहरातील सर्व गावातील डॉक्टरांना आपले दवाखाने नित्यनियमाने उघडावेत व आपली ओपीडी नेहमी चालू ठेवावी असे आदेश दिले. आणि असे असताना सुद्धा अनेक नामवंत डॉक्टर काहीतरी कारणे सांगत आपले दवाखाने या कोरोनाच्या आजारामुळे चक्क बंद ठेवले आहेत. त्यामुळे आता जागे व्हा आपल्या गावात, आपल्या शहरात, आपल्या शेजारी जो दवाखाना आता बंद आहे. जो डॉक्टर आता ओपीडी चालवत नाहीये. तो दवाखाना यापुढे आपल्या गावात कायमस्वरूपी बंद कसा राहील असा निर्णय त्या गावातील नागरिकांनी घ्या कारण याचं डॉक्टर तुमच्या गावात, तुमच्या शहरात तुमच्याच जीवावर लाखो रुपये कमवून मोठे मोठे रुग्णालय बांधले मोठी मोठी घरे बांधली आणि आता तेच डॉक्टर कोरोनाच्या आजारामुळे घाबरून आपला दवाखाना बंद करून घरात बसले आहेत. मग त्यांना आपणही कायमस्वरूपी का घरी बसून तेव्हा विचार करा आणि त्यांना कायमस्वरूपी घरी बसावा.

मी माझ्या डॉक्टर बांधवांना एवढेच सांगू इच्छितो कोरोना या आजारामुळे आपण जर आपले दवाखान्याची ओपीडी बंद केली असेल तर कृपा करून ती उघडी ठेवा जेणेकरून ज्याला सर्दी आहे. ज्याच डोकं दुखतंय, ज्याला बारीकसारीक आजार आहे. असा रुग्ण सरकारी दवाखान्यात न जाता तुमच्याकडे येईल आणि त्याची भीती दूर होईल यासाठी सहकार्य करा.

अनेक डॉक्टरांनी कोरोनाच्या या आजाराला न घाबरता आपली ओपीडी आणि दवाखाने उघडे ठेवलेत त्या डॉक्टरांना मात्र माझा सलाम तुम्ही तुमचे कार्य असेच चालू ठेवा नागरिक नक्कीच तुम्ही दिलेल्या या सेवेला आयुष्यभर कधीच विसरणार नाही.

लक्ष्मीकांत घोणसेपाटील


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here